संतोष देशमुख प्रकरणावरून चक्काजाम, लातूर बार्शी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, मोठा पोलीस बंदोबस्त
संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट करणाऱ्यांना तात्काळ फासावर लटकवा, मंत्री धनंजय मुंढेंचा राजीनामा घ्यावा यासाठी बोरगाव काळे येथे चक्का जाम आंदोलन सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातूर बार्शी रस्त्यावरील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
संतोष देशमुख यांच्या परिवारास आर्थिक मदत करावी.शासकीय नोकरीत सामावून घेतले जावे अशी मागणी केली जात आहे.
तोपर्यंत मंत्री धनजय मुंढे आणि पंकजा मुंढे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा यासाठी बोरगाव काळे रस्त्यावर चक्का जाम करण्यात आले आहे.
या चक्काजाम आंदोलनाचा वाहतूकीवर मोठा परिणाम होत असून लातूर बार्शी रोडवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट करणारे तात्काळ फासावर लटकवा.मंत्री धनजय मुंढे आणि पंकजा मुंढे यांचा मंत्रीपद चां राजीनामा घ्यावा. अशी मागणी होत आहे.