PHOTO: गणेश विसर्जनाला शहरभर लागतात कमानीच कमानी! मिरजमधील ही भन्नाट परंपरा माहितीय का?
सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या (sangli Miraj Ganesh Utsav) प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कमानी सज्ज झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविसर्जन मिरवणुकीवेळी भव्य अशा स्वागत कमानी उभारण्याची मागील बेचाळीस वर्षांपासूनची परंपरा आहे.
मिरवणुकी साठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील चित्रण या कमानीवर लावण्यात येते.
यंदा धर्मवीर संभाजी मंडळाने कोरोनाचा नायनाट करणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्तीचं चित्र कमानीवर लावलं आहे.
हिंदू एकता आंदोलनांमार्फत स्वागत कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र तयार केलं आहे.
अखिल भारतीय विश्वशांती मंडळाने कैलास पर्वत आणि महादेवाचं चित्र बनवलं आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाने बाजीप्रभू देशपांडे यांचा देखावा बनवला आहे.
शिवसेनेने आपल्या कमानी वरती छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र तयार केलं आहे.
तर एकता सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाने आपल्या कमानीवर प्रदूषण हटवा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश दिला आहे. विश्वस्त मंडळाने शंकराची प्रतीकृती उभा केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे.
अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या येथील विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मिरज शहरात गेल्या 42 वर्षापासून भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात येतात. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील चित्रण या वर लावण्यात येते.