Samruddhi Highway : 'गोटा टायर' वाहनांना समृद्धी महामार्गावर 'नो एंट्री'!
समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आता आरटीओने पुढाकार घेतला असून वाहनांच्या टायरची तपासणी सुरू केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) वापर सुरू झाल्यानंतर वाहनांच्या वाढत्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात होती.
या अपघातांच्या वाढत्या संख्येवर पायबंद घालण्याची मागणी करण्यात येत होती. प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी वेग मर्यादेसह इतर नियम लागू केले आहेत.
आता समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना कार चालकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
अति वापर झाल्याने घासलेल्या टायरसह समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर आरटीओने (RTO) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आरटीओने तीन वाहनांवर 20 हजार रुपयांचा दंड (RTO Fine) ठोठावला आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) सरसावले आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत.
आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या प्राणांतिक अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातांवर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
यातच घासलेल्या टायरमुळे अपघात होण्याचे प्रमाण असल्याचे दिसून आढळून आले आहे. त्यानंतर आरटीओने घासलेले टायर असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
याअंतर्गत 'Tred depth Analyzer' च्या साह्याने टायरची तपासणी सुरू आहे. यातील तीन वाहनांचे टायर जास्त घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावर आढळून आले.
या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करीत प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अनेकदा गाडीचे टायर फुटल्याने देखील अपघात होत आहे. तर या महामार्गावर अचानक जनावरे समोर आल्याने त्यांना वाचवण्याच्या नादात देखील अपघात होत आहे.