Russia Ukraine Conflict : युद्धाचा फटका विदर्भातील तांदूळ उत्पादकांना; कोट्यवधी रुपये अडकले
Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे विपरीत परिणाम आता विदर्भातील काही व्यापार आणि उद्योगांवरही दिसू लागले आहेत. पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातकांचे कोट्यवधी रुपये रशिया आणि युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती विदर्भ डेवलपमेंट कौन्सिलचे शिवकुमार राव यांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशिया आणि युक्रेनचे लोक सकाळी त्यांच्या नाश्त्यात तांदळाची खीर खात असल्याने गेल्या काही वर्षात दोन्ही देशात पूर्व विदर्भातील तांदळाची निर्यात कमालीची वाढली होती.
विदर्भ डेव्हलपमेंट कौन्सिल प्रमाणे दर महिन्याला 8 ते 10 हजार टन तांदळाची निर्यात दोन्ही देशात होत होती. मात्र, आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक शिपिंग कंपन्यांनी बोटीतून तांदूळ त्या परिसरात नेण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातकांना दर महिन्याला 30 ते 40 कोटींचा नुकसान सोसावे लागणार अशी माहिती शिवकुमार राव यांनी दिली आहे
शिवाय रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी रशियाच्या बाहेर कुठल्याही प्रकारचे पेमेंट करण्यावर बंदी घातल्यामुळे रशियन व्यापाऱ्यांनी तांदळाचे पैसे थांबवले आहेत. यामुळं जुन्या निर्यातीचे पैसेही मोठ्या प्रमाणावर रशिया आणि युक्रेनमधील व्यापाऱ्यांकडे अडकणार आहे.
या सर्व परिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातक आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती शिवकुमार राव यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान विदर्भातील अनेक औषध निर्माते काही प्रमाणात औषधांची ही निर्यात रशिया आणि युक्रेन ला करत असल्यामुळे त्यांच्या निर्यातीलाही युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसणार अशी भीती विदर्भ डेव्हलपमेंट कौन्सिलने व्यक्त केली आहे.