Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : दुर्मिळातील दुर्मिळ एलिफंट अॅपल वृक्ष सिंधुदुर्गात, पाहा फोटो
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात असा एक वृक्ष आहे, जो दुर्मिळ वृक्ष म्हणून गणला जातो. जैवविविधतेनं संपन्न असलेल्या तिलारी खोऱ्यात अनेक प्रकारची दुर्मिळ झाडं, प्राणी, पक्षी आहेत. वाघ, हत्ती, नागराज याचं याच तिलारीच्या खोऱ्यात वस्तीस्थान. मात्र सध्या एक झाडाची वेगळी कुतूहलपूर्ण चर्चा सुरू आहे. ती म्हणजे एलिफंट अॅपल वृक्षाची.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलिफंट अॅपल वृक्ष या झाडाला लागणारी फळं औषधी आहेत. तिलारी खोऱ्यातील हेवाळे गावात हे झाड असून स्थानिक भाषेत याला 'राज करमळ' म्हणतात.
दोडामार्गात सध्या एलिफंट आणि एलीफंट अॅपल या दोघांमुळे चर्चेत आहे. तिलारी खोऱ्यात हत्ती सध्या उन्हाळी भातशेती, नारळ, फणस, काजूचं मोठं नुकसान करत आहेत. तर एलीफंट अँपल हेवाळे गावात असून त्या दुर्मिळ अशा वृक्षाची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे. वनश्री फाउंडेशनचे सदस्य संजय सावंत, तुषार देसाई यांनी या फळाविषयी माहिती दिली.
एलिफंट अॅपल वृक्ष प्रामुख्यानं आशियामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या प्रदेशांत आढळतो.
अशा दुर्मिळ झाडांच संरक्षण होणं गरजेचं आहे. तसेच तिलारी खोऱ्यात अशी दुर्लक्षित आणि दुर्मिळ झाड आहेत त्यांचं संशोधन होणं गरजेचं आहे.
जैवविविधतेने संपन्न अशा तिलारी खोऱ्यात झाडांचं संशोधन होणं गरजेचं आहे.