PHOTO : कोरोनानंतर बगाड यात्रा जल्लोषात; भाविकांचा उत्साह
महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बगाड म्हणून ओळख असलेल्या बावधन गावची बगाड यात्रा आज कोरोना निर्बंधमुक्त उत्साहात साजरी झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि याच गावाची यात्रा म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी यात्रा.
हजारो भाविकांची गर्दी, आसमंतात गुलालाची उधळण आणि उंचच उंच बगाड, दोन वर्षांनी हे दृश्य पुन्हा एकदा दिसलं
सुमारे चार लाखांपेक्षा जास्त लोकं या यात्रेत सहभागी होतात आणि या बगाडातील एक खास वैशिष्ट्य मानलं जातं म्हणजे, या बगाडाला जुंपली जाणारी शेकडो धष्ट पुष्ट खिलार जातींची बैलं
कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा साताऱ्यातल्या बावधनमध्ये काशीनाथाच्या नावानं चांगभलं असा जयघोष झाला
यावेळी शेलारवाडीच्या बाळासाहेब मांढरेंना बगाड्याचा मान मिळाला
लेझिम, ढोल ताशांच्या गजरात बावधन दणाणून गेलं
बावधनची जत्रा म्हणजे देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा
आज ही यात्रा मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे