In Pics : अखेर ती माझ्या जीवनात आलीच... म्हणत डिसले गुरुजींनी कोणाचं स्वागत केलं पाहिलं का?
अखेर ती माझ्या जीवनात आलीच... असं ट्विट करत रणजित सिंह डिसले अर्थात सर्वांच्या लाडक्या डिसले गुरुजींनी आनंद व्यक्त केला आणि सर्वांनाच त्यांच्या जीवनातील या आनंदाच्या बातमीबाबत कुतूहल वाटलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफार प्रश्न न करता अनेकांनीच त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
गुरुजींनीही या शुभेच्छांचा स्वीकार केला. आता तुम्हीही म्हणाल या शुभेच्छा नेमक्या कशासाठी?
तर, ग्लोबल टीचर म्हणून पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अखेर डिसले गुरुजींच्या हाती या पुरस्काराची मानाची ट्रॉफी आली आहे.
जागतिक स्तरावर भारताची मान अभिमानानं उंचावणाऱ्या डिसले गुरुजी यांनी ही ट्रॉफी हाती घेतली, त्या क्षणीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख बनवत असताना आणि विद्यार्थी घडवत असताना या प्रयोगशील शिक्षकांमुळं देशातील शिक्षण व्यवस्थेला एक वेगळीच उर्जा मिळाली.
संपूर्ण देशाप्रमाणेच सबंध महाराष्ट्रासाठी ही मोठ्या अभिमानाची बाब. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली होती.
QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. डिसले गुरुजींनी त्यांच्या या पुरस्काराची रक्कमही शिक्षणक्षेत्रासाठीच देण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय़ घेतला होता.
जवळपास पुरस्काराच्या संपूर्ण 7 कोटी रुपयांपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले होते. ज्यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल.
'ग्लोबल टीचर' म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही जाहीर करण्यात आली.