PHOTO : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी... विठुरायाच्या गाभाऱ्यात फळा-फुलांचा बहर, रामनवमीनिमित्त आकर्षक सजावट
आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी यानिमित्त विठुरायाचा गाभारा फळा-फुलांनी बहरुन गेला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठुरायाच्या मंदिराला रंगीबेरगी फुलं आणि फळांची रंगसंगती साधत आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सध्या विठुराया कुलूपबंद असला तरी मंदिरातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा मात्र नियमितपणे सुरु आहेत.
गंगाखेड येथील भाविक गोविंदराव तांदळे यांनी ही फुला-फळांच्या सजावटीची सेवा विठुरायाचरणी अर्पण केली आहे.
झेंडू, जरबेरा, गुलछडी या फुलांसह अननसाचा वापर कल्पकतेने या सजावटीत करण्यात आला आहे.
विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखंबी, चौखंबी येथे केलेल्या सजावटीमध्ये विठुरायाचे मंदिर खुलून उठलं आहे.
(PHOTO CREDIT : @@PandharpurVR/Twitter)
(PHOTO CREDIT : @@PandharpurVR/Twitter)
(PHOTO CREDIT : @@PandharpurVR/Twitter)