PHOTO : तुफान वारा, प्रचंड बर्फवृष्टी! पुण्यातल्या गिरीप्रेमींची 'अन्नपूर्णा-1' शिखरावर यशस्वी चढाई, पाहा फोटो
गिरिप्रेमी या पुण्यातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे व जितेंद्र गवारे यांनी जगातील दहावे उंच शिखर माऊंट अन्नपूर्णा-1 (8091 मीटर्स उंच) वर यशस्वी चढाई केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्येष्ठ गिर्यारोहक व श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित उमेश झिरपे यांच्यानेतृत्वाखाली पार पडलेली ही गिरिप्रेमीची आठवी अष्टहजारी मोहीम असून अशी कामगिरी करणारी गिरिप्रेमी ही भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था आहे.
गुरुवारी मध्यरात्री उशिरा कॅम्प 4 हून अंतिम शिखर चढाई सुरू झाली. कॅम्प 4 वर झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे अंतिम शिखर चढाई सुरू करण्यास उशीर झाला त्यात पहाटेच्या सुमारास वार्याच्या वेग वाढल्याने चढाईची गती मंदावली.
दुपारी 12 च्या सुमारास रूट ओपनिंग करणार्या शेर्पा संघाने यशस्वी चढाई केली, त्यामागोमाग गिरिप्रेमीच्या सदस्यांनी शिखरमाथा गाठला.
मोहिमेचे प्रमुख उमेश झिरपे यांनी सांगितलं की, 15 एप्रिल रोजी रूट ओपनिंग करणार्या शेर्पा संघाचे ‘समिट’ व आज 16 तारखेला गिरिप्रेमीच्या संघाचे ‘समिट’ असे नियोजन होते. मात्र, रूट ओपनिंग करणार्या संघाला 800 मीटर दोर कमी पडल्यामुळे तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने काठमांडूहून 1000 मीटर दोर मागवावा लागला व तो कॅम्प 4 पर्यंत पोहचवावा लागला.
त्यामुळे रूट ओपनिंग करणार्या शेर्पा संघाचे समिट एक दिवस लांबले. हवामानाचा अंदाज बघता रूट ओपनिंग संघाच्या मागोमाग गिरिप्रेमीच्या संघानेगुरुवारी रात्री 12 च्या सुमारास अंतिम शिखर चढाई सुरू केली.
संपूर्ण रात्रभर चढाई दरम्यान संघाला जोर्याच्या वार्याच्या व हाडे गोठवणार्या थंडीचा सामना करावा लागला. याच दरम्यान सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने चढाईची गती कमी करावी लागली. शिखरमाथ्याच्या काही मीटर खाली असलेल्या घळीमधून चढाई करताना गिर्यारोहकांचा कस लागला.
या सर्व अडचणींवर मात करत भूषण, सुमित व जितेंद्र यांनी 14 तासांच्या अथक व अविरत चढाई नंतर दुपारी 2.15 च्या सुमारास शिखरमाथा गाठला.
‘माऊंट अन्नपूर्णा-1’ ही गिरिप्रेमीची आठवी अष्टहजारी मोहीम असून याआधी 2012 साली माऊंट एव्हरेस्ट, 2013 साली माऊंट ल्होत्से (चौथे उंच शिखर), 2014 साली माऊंट मकालू (पाचवे उंच शिखर), 2016 साली माऊंट च्यो ओयू (सहावे उंच शिखर) व माऊंट धौलागिरी (सातवे उंच शिखर), 2017 साली माऊंट मनास्लू (आठवे उंच शिखर) तर 2019 साली माऊंट कांचनजुंगा (तिसरे उंच शिखर) अशा सात अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे.