Ram Navami : रामनवमीनिमित्त विठ्ठल मंदिराचा गाभारा बनला काश्मिरी सफरचंदाचा बगिचा; आकर्षक सजावट
आज रामनवमीच्या औचित्य साधत पुणे येथील एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात खास सजावट केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App5 हजार सफरचंदाची आकर्षक सजावट केल्याने विठुरायाची राउळी चक्क काश्मिरी सफरचंदाचा बगिचा बनली आहे.
विठ्ठल मंदिरात विविध सणांना होणारी सजावट ही नेहमीच आकर्षणाचा केंद्र राहिली आहे.
आज रामनवमी असल्याने पुणे येथील भक्त भारत रामचंद्र यादव यांनी सफरचंद आणि फुलांचा वापर करीत ही सजावटीची सेवा दिली आहे.
विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे.
यासाठी 5हजार सफरचंदे , पांढरी आणि पिवळी शेवंती आणि दवना याचा सजावटीसाठी वापर केला आहे.
विठ्ठल रुक्मिणी गाभारा सफरचंदाने लगडून गेल्याने देवाच्या मंदिराला काश्मिरी बगिचाचे रुपडे प्राप्त झाले आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर या सजावटीनं खुलुन दिसत आहे.