Shahu Maharaj : लोकराजाला अनोखं वंदन; 100 सेकंद सगळं स्तब्ध, राजर्षिंच्या कार्याचं स्मरण
आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानिमित्ताने कोल्हापूरकरांकडून शाहूराजांना अनोखी आदरांजली वाहिली.
आज सकाळी 10 वाजता कोल्हापूरकरांनी 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळत शाहूराजांना अभिवादन केलं.
मुंबई येथील पन्हाळा लॉज या ठिकाणी 6 मे 1922 या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. त्या दिवसाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
ही स्तब्धता म्हणजे आपल्या आवडत्या राजाला, रयतेच्या राजाला, शाहू महाराजांना त्यांच्या 100व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन.
या निमित्ताने कोल्हापुरातील सर्व व्यवहार 100 सेकंदासाठी थांबवण्यात आले.
या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील, राज्यातील अनेक शहरं, गावांतील लोकं सहभागी झाले.
निमित्ताने राजर्षी शाहू महाराजांनी रयतेसाठी, समाजासाठी आणि देशासाठी काय योगदान दिलं आहे, काय कार्य केलं आहे त्याचं स्मरण केलं
कोल्हापुरात राज्याचे महत्वाचे मंत्री आणि अधिकारी देखील कार्यक्रमाला हजर होते. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली