Ravi rana Meets Navneet Rana : 12 दिवसांनी भेट..अश्रूंचा बांध, अशी झाली राणा दाम्पत्याची भावनिक भेट
खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता आमदार रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरवी राणा यांची 12 दिवसांनंतर सुटका झाली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
त्यामुळे आमदार रवी राणा आता तळोजातून बाहेर पडल्यानंतर थेट लीलावती रुग्णालयात भेटीला गेले आहे
यावेळी नवनीत राणांना अश्रू अनावर झाले आहे.
नवनीत राणा यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात ठेवायचं की डिस्चार्ज द्यायचा याचा निर्णय होणार आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती
त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला.
रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने वहायरल होत आहे