Weather : आजही राज्यात अवकाळीचा इशारा
राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडत आहे. याचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज (13 एप्रिल) राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
13 ते 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत देखील आज काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्यरात्री मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं काही ठिकाणी झाडांची पडझड देखील झाली आहे. तर काही ठिकामी घरावरील पत्रे देखील उडून गेले आहेत.
सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालं आहे.
. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.