Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary: महामानवाला वंदन! 18 हजार पुस्तकांच्या माध्यमातून साकारली बाबासाहेबांची मोझेक प्रतिकृती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीची तयारी सर्वत्र सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेते, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार अशा विविध रुपात बाबासाहेबांच्या योगदानाचे स्मरण केले जाते.
अस्पृश्यताविरोधी चळवळीच्या लढ्यासह बाबासाहेबांना त्यांच्या अभ्यासासाठीदेखील ओळखले जाते.
लातूरमध्ये बाबासाहेब आंबडेकरांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात येत आहे.
लातूर शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी बाबासाहेबांची मोझेक प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
तब्बल 18 हजार पुस्तकांचा वापर करून 11 हजार चौरस फूट जागेवर ही भव्य मोझेक प्रतिकृती साकारली आहे.
लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिकृति निर्माण करण्यात आली आहे.
ड्रोनच्या माध्यमातून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोझेक प्रतिकृती मनाचा ठाव घेत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही मोझेक प्रतिकृती चेतन राऊत या कलाकाराने साकारली आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या विचारांची प्रासंगिकता आजही कायम आहे.