Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबो ; मोदींवर गंभीर आरोप...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. (Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान मोदी यांचा आत्मा अदानींमध्ये आहे.' तसेच त्यांनी अॅपलच्या अलर्टवरुन देखील सरकारवर निशाणा साधला. (Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
त्यांनी म्हटलं की, 'आम्ही अदानीच्या मुद्द्यावर सरकारला इतकं कोंडीत पकडलं की ते आता रगिरीचा अवलंब केला आहे. सध्या सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर आहेत आणि पंतप्रधान मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. (Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
पंतप्रधान मोदी यांचा आत्मा अदानींमध्ये आहे.' तसेच त्यांनी अॅपलच्या अलर्टवरुन सरकारवर निशाणा साधला. (Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
सध्या देशाची सत्ता अदानींच्या हातात आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी यांनी म्हटलं, तुम्ही कितीही हेरगिरी केली तरी आम्ही मागे हटणार नाही. (Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
राहुल गांधी हे सातत्याने हे मोदी सरकार नाही तर अदानी सरकारवर सातत्याने वक्तव्य करत असतात. त्यांच्या याच वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला की, हे सरकार कसं बदलेल?(Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
यावर बोलताना राहुल गांधी यांनी म्हणले की, मी यावर विचार केला आहे. फक्त सरकार बदलून अदानी बाजूला होणार नाही. मी वेळ आल्यावर सांगेन.(Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
तसेच भांडवलशाहीवर बोलताना राहून गांधी म्हणाले की, 'मी आयडियाज ऑफ इंडियाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक मोठी लढाई आहे. मला सत्य बोलण्याची सवय आहे.(Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
आपण मक्तेदारीचे बळी बनत आहोत. परिणामी आपल्या देशात गुलामगिरी वाढत चाललीये. मी गुलामगिरीच्या पूर्णपणे विरोधात आहे. असेही राहुल गांधी म्हणाले. (Photo Credit : Rahul Gandhi Facebook)
सध्या ईडी आणि सीबीआयवर देखील अदानींचे नियंत्रण आहे. यामुळे दलित, आदिवासी लोकांना त्यांचे अधिकार मिळत नाही,' असं राहुल गांधींनी म्हटलं. (Photo Credit : Rahul Gandhi Facebook)