PHOTO: कापूस वेचला, ठेचा भाकरीची न्याहारी सुद्धा केली; रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा बीडच्या गेवराईमध्ये दाखल झाली असून, यावेळी पवारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.

Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra

1/9
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली असून, ही यात्रा गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात आहे.
2/9
दरम्यान, रात्री गेवराई तालुक्यात मुक्काम केल्यानंतर रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा माजलगावच्या दिशेने निघाली.
3/9
दरम्यान, याचवेळी बाबुळवाडीच्या शिवारात त्यांनी शेतात कापूस वेचणाऱ्या शेतकऱ्यांसोबत स्वतः कापूस वेचत चर्चा केली.
4/9
दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी न्याहारीला ठेचा भाकर खाऊन शेतकऱ्यांचा आग्रह पूर्ण केला.
5/9
यावेळी आमदार संदीप क्षीरसागर देखील रोहित पवार यांच्या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.
6/9
दरम्यान, याबाबत रोहित पवार यांनी ट्वीट म्हटले आहे की, आज युवा संघर्ष यात्रेदरम्यान कापूस उत्पादक शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला.
7/9
गेल्या वर्षी वर्षभर कापूस घरात ठेवून देखील भाव मिळाला नाही, लोकांची देणी द्यायची होती म्हणून अखेर नाईलाजाने कमी दराने कापूस विकावा लागला, गेल्या वर्षी खर्च देखील निघाला नाही : रोहित पवार
8/9
यंदा दुष्काळ असल्याने उत्पन्नात मोठी घट झाली असून, यंदा हंगामच वाया गेला असल्याची भावना या शेतकरी कुटुंबाने व्यक्त केली :रोहित पवार
9/9
सरकारला एकच सांगणं आहे, मराठवाड्यात परिस्थिती खूप बिकट आहे, सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा : रोहित पवार
Sponsored Links by Taboola