Photo : काठी न् घोंगडी घेऊ द्या की रं...
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा तिसरा दिवस आहे. सकाळी सहा वाजता ही पदयात्रा सुरु झाल. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत जोडो यात्रा सव्वा तीन तासांचा पायी प्रवास करुन नायगावमध्ये दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचे स्वागत.
राहुल गांधी याच्या भारत जोडो यात्रेत लहान-मोठ्यांचा सहभाग. राहुल गांधीचे सर्वच ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महिलांचा देखील मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळत आहे.
साडेतीन तासानंतर भारत जोडो यात्रेचे आजचे सकाळचे सत्र संपले आहे. शंकरनगर ते नायगाव असा 12 किमीचा प्रवास पूर्ण झाला आहे. नायगाव येथील कुसुम मंगल कार्यालयात पहिला विश्राम होणार आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस सुरू आहे. या यात्रेमध्ये आज पुणे शहर काँग्रेसच्या काही महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या हातात फलक आहेत. या फलकावर हम दो हमारे दो, बेरोजगारी, महागाई याबाबतचे सर्व डिटेल्स दिले आहेत.
तिसऱ्या दिवशी या यात्रेमध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश तसेच माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेही सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील सहभागी झाले आहेत.
युवकांबरोबर युवतींचा देखील भारत जोडो यात्रेत सहभाग आहे. मोठ्या संख्येनं तरुण वर्ग या यात्रेत सहभागी झाला आहे.
ठिकठिकाणी राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येत आहे. तिसऱ्या दिवशी शंकरनगरहून ही यात्रा नायगावकडे रवाना झाली.
सध्या यात्रा शंकरनगहून नायगावमध्ये दाखल झाली आहे. दुपारी चार वाजता ही यात्रा दुसऱ्या टप्प्यात मार्गक्रमण करणार आहे.