In Photo : महाराष्ट्र-गुजरात राज्य एकत्र आलं, गावकऱ्यांनी हातात फावडं घेतलं अन् रस्ता झाला...
सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खिरपाडा (खो ), वांगणपाडा ( खो ), कहांडोळपाडा (खो ), वडपाडा (खो ), तसेच गुजरात राज्यातील पांचविहिरा, टोकरपाडा, मोहाचीमाळी या गावातील तरूणांनी एकत्र येऊन बैठक घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र,गुजरात सिमाभागात ये जा करण्यासाठी जनतेला पार नदी पार करावी लागत असते पावसाळ्यात पाऊसाचे पाणी जास्त असल्यामुळे गैरसोय असते.
परंतु दिवाळी नंतर पाऊस उघडताच नदीचा प्रवाह कमी प्रमाण झाल्याने दरवर्षी प्रमाणे गुजरात, महाराष्ट्रतील हद्दीतील गावे एकत्र येऊन प्रत्येक गावाला एक दिवस श्रमदानं करण्यासाठी नेमले जाते.
या वर्षी फार नदीत गाड्या जाण्यासाठी रस्ता बनविण्यासाठी एकत्र येत एका दिवसाला एक गाव श्रमदान सुरु करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार पहिला दिवस खिरपाडा (खो), दुसरा दिवस वांगणपाडा (खो ), तिसरा दिवस कहांडोळपाडा (खो ), चौथा दिवस खोबाळा दिगर, पाचवा दिवस सागपाडा, सहावा दिवस वडपाडा (खो) इत्यादी महाराष्ट्रतील गावे.
त्यानंतर गुजरात राज्यातील गावे सातवा दिवस टोकरपाडा, आठव्या दिवशी श्रमदान पांचविहिरा असे नऊ दहा गावे मिळवून पार नदीतील रस्ता दगड गोडे बाजूला सारून पद्धतशीर पणे रस्ता बनविण्यासाठी जबाबदारी दिल्याप्रमाणे श्रमदानं करुन रस्ता सुरळीत करण्यात आला.
इथे ना कुठे सरकारी अधिकारी मदतीला आले, ना रोजगार हमीवाले, या गावांनी एकत्र येऊन लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करुन रस्ता तयार करण्यात आला.
परिसरातील गावांना ये जा करण्यासाठी सोय व्हावी, परिसरातील गावाला या रस्त्याचा फायदा व्हावा, म्हणून गावांनी एकत्र येत श्रमदानं केले. महाराष्ट्र, गुजरात गावातील गावे एकत्र येऊन श्रमदानातून पार नदीत रस्ता तयार करण्यासाठी श्रमदानास उपस्थित होते.
आज खडबडीत का होईना रस्ता तयार झाला असला तरी उन्हाळ्यानंतर पुन्हा हीच परिस्थिती येथील गावाच्या वाट्याला येणार असल्याचेच स्थानिकांनी सांगितले.