Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटना नेमकं काय घडलं? भीषण अपघातातील 5 मोठे मुद्दे
जळगावातील परधाडे गावाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना झाली असून या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे निघाली होती, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही गाडी परधाडेगावाजवळ पोहोचली असता हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.
जळगाव - परधाडे स्थानकादरम्यान मोटरमनने पुष्पक एक्स्प्रेसचे ब्रेक दाबल्यानंतर रुळावर अचानक ठिणग्या उडाल्याची माहिती ही पुढे आली आहे.
दरम्यान, प्रवाशांना वाटलं आग लागली असावी, त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
प्रवाशांनी विरुद्ध दिशेने उड्या मारल्या, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने बंगळुरु एक्स्प्रेस येत होती, त्या ट्रेनची धडक उड्या मारलेल्या प्रवाशांना बसली.
दुर्दैवानं यात ही दुर्घटना घडली असून यात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागाला असून अनेक जण जखमी झाल्याचे ही बोलले जात आहे.