Pune Mumbai Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील बोरघाटात वाहतूक कोंडी, अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा
मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या बोरघाट आणि खालापूर टोलजवळ एक ते दीडकिलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
दिवाळीमुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या एक तासापासून वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी बाहेर पडत आहेत.
महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
बोरघाटात अमृतांजन पूलाजवळ वाहनांची रांग पाहायला मिळत आहे.
सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे
विकेंडला तसेच सणासुदीला कायमच मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी पाहायला मिळते