PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवीच्या दर्शनाला; पंतप्रधानांसाठी बंजारा समाजाकडून 'या' खास भेटवस्तू
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या,शनिवारी पहिल्यांदाच वाशिमच्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर ते जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला ही ते हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली असून पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास मानाची पगडी तयार करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशमधून ही खास पगडी पोहरादेवीत दाखल झाली असून पंतप्रधान मोदी यांना ही खास पगडी उद्या भेट दिली जाणार आहे. बंजारा समाजात पगडीला अतिशय मानाचे स्थान आहे.
सोबतच पंतप्रधान यांना चांदीचे कडे आणि बंजारा समाजाचा पट्टा महंतांकडून भेट स्वरूपात दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहिल्यांदाच पोहरादेवीत येत आहे. यावेळी ते जगदंबा देवी, सेवालाल महाराज, रामराव महाराज यांच्या दर्शनही ते घेणार आहेत.
देशात सध्या 14 ते 15 कोटी संख्या ही बंजारा समाजाची आहे. उद्या याठिकाणी 10 लाख पेक्षा जास्त बंजारा समाजबांधव पोहरादेवीत येतील, असा दावा करण्यात येत आहे.
सेवादास महाराज हे गोरक्षक होते तसेच ते श्री कृष्ण देवाचेही अवतार होते. त्यांचा पगडी ही पोषाख आहे. म्हणून सेवादास महाराजाच्या रुपात देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना ही पगडी आणि चांदीचे कडे संतांमार्फत देण्यात येणार आहे.
उद्याचा दिवस हा बंजारा समाजासाठी सुवर्ण दिवस आहे. नावरात्रीमध्ये मी येणार असं शब्द पंतप्रधान मोदी यांनी दिला होता. त्यानुसार ते उद्या येत असल्याची माहिती महंत बाबूसिंग महाराज यांनी दिली.
तसेच यावेळी बंजारा समाजाचे कल्चर आणि पोशाख, पट्टा, पगडी आणि कडे भेट म्हणून यावेळी देणार असल्याचेही ते म्हणाले.