मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
महाराष्ट्राची राज्यभाषा माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील ही मागणी केली होती.
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत आज (दि.3) चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानंतर, महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, 13 कोटी मराठी जनांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त होत आहे.
यापूर्वी देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर, अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी आपली मराठी भाषा ही आता देशातील 7 वी भाषा ठरली आहे.
सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली. तामिळनंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.
आता, विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात दर्जा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचं महाराष्ट्रात सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तर, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा जुमला करण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलीय