एक्स्प्लोर
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेसाठी तयारी सुरु; कर्नाटकातून 11 हजार 907 ईव्हीएम दाखल
लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दीड वर्ष अगोदरच तयारी सुरु करण्यात आली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 11 हजार 907 ईव्हीएम कर्नाटकातून दाखल झाली आहेत.
lok sabha election 2024
1/10

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आतापासून तयारी सुरु करण्यात आली आहे.
2/10

कोल्हापुरात कर्नाटकमधून बेळगाव व हवेरी जिल्ह्यातून 11 हजार 907 ईव्हीएम दाखल झाली आहेत.
3/10

शहरातील राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात ईव्हीएम ठेवण्यात आली आहेत.
4/10

या ईव्हीएमचे स्कॅनिंग केलं जाणार आहे.
5/10

देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे.
6/10

निवडणूक आयोगाने आज कर्नाटकातील बेळगाव व हवेरी जिल्ह्यातील यंत्रे कोल्हापूरमध्ये पाठवली आहेत.
7/10

कर्नाटकच्या अधिकाऱ्यांकडून कोल्हापूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांना ही मतदान यंत्रे सुपूर्द करण्यात आली.
8/10

यावेळी प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार शशिकांत किल्लेदार, अरुण पुजारी, नंदकिशोर नलवडे आदी उपस्थित होते.
9/10

निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेचा विचार करता सहा महिने अगोदरच मशीन दाखल झाली आहेत.
10/10

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.
Published at : 18 Nov 2022 12:59 PM (IST)
आणखी पाहा






















