Photo : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपूर दौऱ्यावर, शहरभर झळकले हनुमानासोबतचे पोस्टर्स
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज संध्याकाळी अमित शाह (Amit Shah) नागपुरात पोहोचणार असून तीन दिवसांचा महाराष्ट्र आणि वीस तासांच्या नागपूर दौऱ्यात अमित शाह अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे
अमित शाह यांच्या स्वागतासाठी नागपूर शहरात जय्यत तयारी सुरू आहे.
सुरक्षा व्यवस्थेसह शहरात स्वच्छता देखील केली जात आहे.
नागपूर विमानतळाबाहेरच अमित शाह यांच्या स्वागतासाठी मोठा स्टेज उभारण्यात आला आहे.
नागपूर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
विमानतळाबाहेर उभारण्यात आलेल्या स्टेजवरच निवडक कार्यकर्त्यांकडून अमित शाह यांचं स्वागत करण्यात येणार आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि प्रशासन देखील अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत.
अमित शाह यांचे संकटमोचक मानल्या जाणाऱ्या हनुमानासोबतचे पोस्टर्स नागपुरात ठीक ठिकाणी लागले आहेत.
अमित शाह यांच्या स्वागतासाठी भाजपने नागपुरात जय्यत तयारी केली आहे.