गायीने दिला चार वासरांना जन्म, सगळीच वासरे ठणठणीत
गायीने (Cow) एक नाही दोन नाही तर तब्बल चार वासरांना जन्म (Birth to four calf) दिल्याची घटना घडली. ही घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी (Papari) गावात घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही चार वाससे आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी चार वासरांचा जन्म होणं ही दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. दरम्यान, गायीच्या वासरांना बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
मोहोळ (Mohol) तालुक्यातील पापरी गावात एका गायीने चार वासरांना जन्म दिला आहे. गणेश लोंढे (Ganesh Londhe) असे गायीच्या मालकाचे नाव आहे.
लोंढे यांनी 2017 ला मुंबईतील नोकरी सोडून गावात शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लक्ष्मी नावाची ही गाय खरेदी केली होती.
या गायीची आतापर्यंत चार वेळा प्रसूती झाली आहे. त्यात तिने पहिल्यांदा अशा पद्धतीने एकाच वेळी चार वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे.
व्यवस्थित खुराक दिल्यानं गायीचे पोषण व्यवस्थित झाल्यानेच असे झाले असावे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली.
गायीने जन्म दिलेल्या चार वासरांपैकी एक खोंड आणि तीन कालवडी आहेत.
पहिल्यांदा गाईला खोंड झाले. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने गायीनं तीन कालवडींना जन्म दिल्याची माहिती शेतकरी गणेश लोंढे यांनी दिली आहे. गाय आणि ही चारही वासरे व्यवस्थित आहे.
आजपर्यंत आपण गाईला एक किंवा दोन वासरे झाल्याचे एकले किंवा बघितले असेल. पण मोहोळ तालुक्याच एकाच वेळी गायीने चार वारसांना जन्म दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
चार वासरांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक आहे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी असल्याचे शेतकरी गणेश लोंढे यांनी सांगितले आहे.