Rajiv Satav Photo : राजीव सातव म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, अभ्यासू आणि आक्रमक बाणा
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे वयाच्या 47 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वीच कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा राजीव सातव यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता आणि शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला होता.
राजीव सातव यांचा जन्म 21 सप्टेंबर 1974 साली हिंगोली जिल्ह्यातील मसोड, तालुका कळमनुरी येथे झाला. त्यांच्या आई, रजनी सातव या शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होत्या.
राजीव सातव यांनी आपलं शिक्षण पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून पूर्ण केलं.
पंचायत समिती सदस्य, आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.
उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेले राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिलं. उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान या धोरणाने काँग्रेस पक्षात त्यांनी आपलं मोठं वजन निर्माण केले होतं.
पंचायत समिती सदस्य, आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं.
राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. मार्च 2020 साली त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त झाली. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रित सदस्यही होते.
राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाचे न भरून येणारे नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. राजीव सातव यांचे हिंगोलत उद्या सकाळी साडे दहा वाजता अंत्य संस्कार होणार आहेत