Cyclone TaukTae : कोकणातील बहुतांश भागावर काळ्या ढगांची चादर
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
16 May 2021 07:59 AM (IST)
1
अरबी समुद्रात तयार झालेलं तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हेच चित्र शनिवारी मध्यरात्रीपासून पाहायला मिळालं.
3
सध्याच्या घडीला कोकणातील रत्नागिरी, सिधुदूर्ग, चिपळून भागावर काळ्या ढगांची चादर पाहायला मिळत आहे.
4
बहुतांश भागांमध्ये ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाटही सुरु आहे.
5
रत्नागिरीमध्ये या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून, प्रशासन सर्वतोपरी सतर्क आहे.
6
या भागात अत्यावश्यक सेवांचीही दुकानं बंद ठेवण्यात येणार असून, लसीकरणही बंद ठेवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
7
एकंदरच तोक्तेचा इशारा पाहता कोकण किनारपट्टी अधिक सतर्क असल्याचं दिसत आहे.