PHOTO : कसा आहे टाटा-एअरबस प्रकल्प ?
टाटा-एअरबस प्रकल्पात मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती होणार असून एकूण 56 सी-295 या विमानांची निर्मिती केली जाणार आहे. सी-295 एमडब्ल्यू विमानं एअरफोर्समध्ये असलेल्या एव्हीआरओ- 748 विमानांना रिप्लेस करणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकूण 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. संरक्षण मंत्रालयाकडून या प्रकल्पाला आधीच हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. यातील 40 विमानं भारतात तयारी केली जातील.
टाटा-एअरबस हा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील विमान निर्मिती प्रकल्प असणार आहे. ज्यामुळे सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सची मोनोपॉली संपुष्टात येणार आहे.
मे 2015 मध्ये डीएसीच्या प्रमुखपदी असलेले माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टाटा-एअरबस प्रकल्पाला सर्वात आधी मंजुरी देत धाडसाचे पाऊल उचलले होते. टाटा-एअरबस प्रकल्प भारताच्या एरोस्पेस क्षेत्रातल्या विकासाला मदत करेल, यात दहा वर्षात एकूण 25 हजार रोजगाराची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
टाटा-एअरबेस प्रकल्प नागपुरात व्हावा यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. नागपूर हे डिफेंस हब, कार्गो हब आहे, सोबतच बोईंग, ब्रह्मोस एरोस्पेससारख्या कंपन्या नागपूरमध्ये आहेत. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर तो नागपुरात होण्याची शक्यता अधिक आहे.
राज्यासोबत करार झाल्याच्या 4 वर्षांच्या आत 16 विमानांची बांधणी पूर्ण करत एअरफोर्सला द्यावी लागणार आहेत. 40 विमानांची टप्प्याटप्प्याने एअरबस आणि टीएएसएल निर्मिती करत 10 वर्षात करार पूर्ण करायचा आहे.