PHOTO : पंकजा मुंडे यांची बीड आणि धनंजय मुंडे यांच्यासंबंधी नऊ महत्त्वाची वक्तव्यं
बीडची बदनामी मी कधीच केली नाही, बीडचा बिहार होतोय असा आरोप पालकमंत्र्यांच्या पक्षाच्या आमदारांनी केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडमध्ये कायदा आणि सुव्यस्था बिघडली आहे. पालकमंत्र्यांची जी इमेज आहे ती बिघडली आहे.
पालकमंत्री त्यांच्याच पक्षाचे समाधान करु शकत नाहीत.
बीड जिल्ह्यामध्ये माफियाराज बोकाळला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की प्रत्येक काम पैसा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे सामान्यांची कामं रखडली जात आहेत.
पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची इमेज ही त्यांच्यासारखीच झाली आहे. जिल्हा परिषद म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण झालं आहे.
या आधी बीडमध्ये चांगले अधिकारी यायचे, पण आता चांगले अधिकारी जिल्ह्यात यायला धजावत नाहीत.
बीड जिल्ह्याच्या लोकहिताची कोणतीही नवीन योजना अद्याप दिसली नाही. आम्ही जी या आधी कामं केली आहेत त्यांची उद्धाटनं मात्र पालकमंत्री करताना दिसत आहेत.
जिल्ह्यामध्ये दरोड्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे.