PHOTO : साताऱ्यात रंगलीये 'महाराष्ट्र केसरी'ची चुरस; लाल मातीत कुस्तीचा थरार
कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर गाडा रुळावर यायला लागला. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी साताऱ्यात 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्यानं यावर्षी सर्व पैलवान मोठ्या तयारीनिशी उतरले आहेत. अशातच मानाची गदा कोण पटकावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यजमानपद यंदा साताऱ्याला मिळालं आहे. 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
काल (बुधवारी) 'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यात दावेदार किरण भगत विरूद्ध वेताळ शेळके यांच्यात लढत झाली. (फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
या लढतीत महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार असणाऱ्या किरण भगतवर वेताळ शेळकेनं मात केली आणि विजय मिळवला. (फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सकाळच्या सत्रातील आजचे सामने कडाक्याच्या उन्हामुळं पुढे ढकलण्यात आले आहेत. हे सर्व सामने सायंकाळी चार वाजल्यानंतर खेळवण्यात येणार आहेत. (फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. अशातच यंदा या स्पर्धेचं आयोजनामुळं राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे. (फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
दरम्यान, यापूर्वीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020 मध्ये पार पडली होती. या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली होती. हर्षवर्धनने शैलेश शेळके याचा 3-2 असा पराभव केला होता. (फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
(फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
(फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
(फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
(फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)
(फोटो सौजन्य : प्रमोद इंगळे)