Photo: बेळगावात महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे बिनविरोध
निवडणूक झाल्यानतंर तब्बल 14 महिन्यानंतर झालेल्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली आहे. बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमहापौरपदासाठी निवडणूक होऊन त्यामध्ये भाजपच्या रेश्मा पाटील यांनी बाजी मारली.
बेळगाव महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली नव्हती.
आता तब्बल 14 महिन्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली असून त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागली.
महापौर निवडणुकीसाठी भाजपच्या शोभा सोममाचे यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली.
उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला होता.
त्यामध्ये रेश्मा पाटील यांना 42 मते तर वैशाली भातकांडे यांना चार मते मिळाली.
महापौर, उपमहापौर निवडणुकीला सहा जण अनुपस्थित राहिले तर तीन नगरसेवक तीन मिनिटे उशिरा आल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला.
यावेळी उशीरा आलेल्या नगरसेवकांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली पण त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.
बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून 58 पैकी भाजपचे 35 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे दहा नगासेवक असून एमआयएम पक्षाचा एक नगरसेवक आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार नगरसेवक आहेत.