Photo: यात्रेच्या निमित्ताने अक्कलकुवा बैल बाजार फुलला
गुजरात-मध्यप्रदेशचा सीमावर्ती भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार अशी ख्याती असलेल्या अक्कलकुवा येथील बाजार गर्दीने फुलल्याचं दिसून येतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्कलकुवा येथील कालिका मातेच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने हा बाजार भरतो. यंदा बैल बाजारामध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळत आहे.
यंदा दोन वर्षाच्या खंडानंतर भरणाऱ्या बैल बाजारात मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी दाखल झाले असून या खिल्लार ,नागोरी ,गावठी, जातीच्या मोठ्या प्रमाणात आवक होत असते.
बैलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून खरेदी-विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. शेतकऱ्यांनी आणि व्यापारी या ठिकाणी बैल खरेदीसाठी आणि विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
अक्कलकुवा होणाऱ्या बैलबाजारासाठी दोन हजारापेक्षा अधिक बैलजोड्या येत असतात. या ठिकाणी लाकडी आणि लोखंडी बैलगाड्याही विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
अक्कलकुवा या ठिकाणी होणाऱ्या बैल बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून बाजार बंद असल्याने यावर्षी बैल बाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळत आहे.
गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांच्या सीमेवरती भरणाऱ्या बैल बाजारात या तिन्ही राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात येत असतात.
या वर्षी बाजारात गावठी बैलांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून त्यांच्या किमती 25 हजारांपासून लाखाच्या घरात आहेत.
या सीमावर्ती भागात खिल्लार बैलांना अधिक पसंती दिली जात असल्याचं चित्र आहे. या ठिकाणच्या तरुणांमध्ये खिल्लार बैलांची विशेष आवड असून या जातीच्या बैलांचा वापर हा शर्यतीसाठी केला जातो.