Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics | भांडुपमध्ये मॉलला भीषण आग, वरच्या मजल्यावर असलेल्या कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू
भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय असून कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य गेल्या सहा तासांपासून सुरु आहे.
ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली. रुग्णालयात आग लागली तेव्हा 76 रुग्ण होते.
त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. मात्र नंतर ही आग प्रचंड वाढली असून अजून ही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या ठिकाणी मॉलमध्ये रुग्णालय कसे केले गेले या बद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले असून या बाबत चौकशी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.
बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बचाव कार्य संपल्यानंतर ही आग कशी लागली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं महापौरांनी आणि उपायुक्तांनी स्पष्ट केलं.