महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाइन स्वाध्याय उपक्रमाला ग्रामीण भागात खोडा!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ऑनलाइन अध्यापन सुरू असताना या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे देखील गरजेचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे राज्य शासनाने ऑनलाइन स्वाध्याय उपक्रमाला सुरुवात केली. मात्र, या उपक्रमासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक अडचणींचा सामना करत असल्याचे दिसत आहे.
बुलडाणा तालुक्यातील झरी या डोंगरांनी वेढलेल्या गावात कोणत्याही कंपनीच्या मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही. परंतु, गावातील उंच भागातील एका दुमजली इमारतीच्या छतावर मोबाइल नेटवर्क मिळत असल्याने स्वाध्याय सोडविण्यासाठी हे सर्व विद्यार्थी एकत्र येतात व आपला स्वाध्याय पूर्ण करताना दिसत आहेत.
ऑनलाइन शिक्षण आणि स्वाध्याय यासाठी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाईल, नेटवर्क, जागा अश्या अनेक अडचणी येत आहेत.
मात्र, कोरोनाची दाहक परिस्थिती पाहता विद्यार्थी व पालक या सर्व संकटांवर मात करताना दिसत आहेत.
काही ठिकाणी तर इंटरनेट नेटवर्क नसल्याने विद्यार्थी झाडांवर चढून अभ्यास करताना दिसत आहेत.
भर उन्हात विद्यार्थांना झाडावर चढून अभ्यास करावा लागतोय.