PHOTO : ड्रोनच्या नजरेतून टिपलेली समृद्धी महामार्गाची सायंकाळच्या वेळची विहंगम दृश्ये
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी (कोकमठाम) हे 520 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. महामार्गाचे शिर्डी ते मुंबई दरम्यानचे काम जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
या महामार्गावर प्राथमिक टप्प्यात 138.47 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रस्तावित आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
राज्यातील 10 जिल्हे, 25 तालुके आणि 392 गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर 25 इंटरचेंज असून महामार्गालगत 18 नवनगरे असतील. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
महामार्गावर 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 32 पूल असून लहान पुलांची संख्या 317 आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किमी असून रुंदी 120 मीटर (डोंगराळ भागासाठी 90 मी.) आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
यात 3+3 अशा 6 मार्गिकांचा समावेश असून त्यावर वाहनाचा प्रस्तावित वेग प्रति तास १२० किमी असेल. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
नागपूर-मुंबई दरम्यान गतिमान वाहतुकीसाठी 31 ऑगस्ट 2015 रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बनवण्याची विधानसभेत घोषणा करण्यात आली होती. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
हा महामार्ग विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)