Pankaja Munde: पंकजा मुंडेंची बार्शीत 'जोरदार एन्ट्री', समर्थकांनी केले 'जंगी स्वागत'; पाहा फोटो
पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यभरात देव दर्शन दौरा केला जात असून, या दौऱ्याला त्यांनी 'शिवशक्ती परिक्रमा' दौरा असे नाव दिले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंकजा मुंडे यांच्या 'शिवशक्ती परिक्रमा' दौऱ्याचा आजचा सहावा दिवस असून, त्यांच्या आजच्या दौऱ्याची सुरवात उस्मानाबाद जिल्ह्यातून झाली आहे.
तर भाजपचे धाराशीव-कळंब विधानसभा निवडणूक प्रमुख दत्ता कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी भेट दिली, आणि त्यानंतर त्यांनी पुढील प्रवासास सुरुवात केली.
सकाळी धाराशीव येथून बार्शी तालुक्यात प्रवेश करताच नारेवाडी येथे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले.
दरम्यान, बार्शी शहरात आमदार राजेंद्र राऊत आणि प्रचंड संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी शिव-शक्ती परिक्रमेचं मोठ्या जल्लोषात वाजत-गाजत स्वागत केलं.
या भागाने लोकनेते मुंडे साहेबांइतकंच माझेवरही प्रेम केलं आहे. मी ईश्वराकडे एकच प्रार्थना करते की, ही जनतेची सेवा आणि शक्ती वाढविण्याकडे समर्पित भावनेनं काम करण्याची शक्ती दे, असे पंकजा मुंडे म्हणाल्यात.
बार्शी येथे पंकजा मुंडे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी भल्ला मोठा असा हार तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हारसाठी दोन जेसीबीची मदत घेण्यात आली.
यावेळी अनेक महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच त्यांच्याकडून पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांनी केलेल्या जंगी स्वागताबद्दल आभार देखील मानले.