Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची रिपरिप सुरु
राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही भागात जोरदार पावसामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुार विविध भागात पावसाची हजेरी
नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर वाशिम, नंदुरबार, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.
वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. या
या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर होती. त्या पिकांना पावसामुळं जीवदान मिळालं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला होता.
नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात चणकापूर,आंबुर्डी,जामशेत, अभोणा आदी भागात जोरदार पाऊस झाला.