अतिक्रमणाच्या विळख्यात पांडुरंगाचं मंदिर! श्वानांचा मुक्त वावर, भाविकांचा चालताना जीव गुदमरतोय
विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमणामुळे मंदिराचा श्वास कोंडू लागलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठ्ठल मंदिर परिसरात भाविकांना गर्दीच्या वेळी ही व्यवस्थित चालता यावे यासाठी नागरिकांचा विरोध मोडून भव्य कॉरिडॉर बनविण्याच्या हालचाली शासन स्तरावरून चालू असून यामुळे मंदिर परिसरातील अनेक घरे आणि दुकानांवर बुलडोझर चालवावा लागणार आहे .
कालच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मंदिराचे आपत्तीच्या संदर्भात पाहणी केली आणि भाविकांच्या सुविधेसाठी भव्य कॉरिडॉर उभारणार असे संकेत दिले होते.
मात्र मंदिर परिसरात होत असलेल्या अतिक्रमणामुळे आहे हाच रस्ता भाविकांना चालायला अपुरा पडू लागला आहे.
मंदिर परिसरात मंदिराच्या भिंतीला लागूनच मोठ्या प्रमाणात फेरीवाले आणि दुकानदारांची अतिक्रमणे झाल्याने भाविकांना यातून वाट काढत चालणे ही मुश्किल बनत आहे.
यातच मंदिर परिसरात मोकाट स्वान आणि इतर जनावरे फिरत असल्याने भाविकांना मंदिरापर्यंत पोचणे म्हणजे एक मनस्ताप बनू लागला आहे.
पोलीस प्रशासन पालिका प्रशासन आणि मंदिर प्रशासन याकडे जाणीवपूर्वक काना डोळा करते आहे असे चित्र आहे.