#अक्षरकलावारी : अक्षरकलेमधून उलगडणार पंढरीची वारी; अमेरिकेत राहणाऱ्या शीतल सोनार यांचा अनोखा उपक्रम
सध्या विठुरायाच्या भेटीची ओढ असंख्य वारकऱ्यांना लागली आहे. परंतु, यंदाची आषढी वारीही कोरोना संकटात पार पडणार आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआषाढी वारीच्या निमित्तानं वारकरी संप्रदाय गावोगावी नियोजन करण्यात गढलेला असतो, विठ्ठल दर्शनाची आस त्यांना लागलेली असते. परंतु, यंदाची वारी नेहमीप्रमाणे नसणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे मात्र आता काही मर्यादित पालखी सोहळ्यांनाच शासनानं परवानगी दिली आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
पण म्हणुन विठुरायाला भेटायचं नाही असं काही नाही. डिजिटल माध्यमातून आपल्या सर्वांना अक्षरकलेच्या म्हणजेच सुलेखनातून देवाचे दर्शन शितलतारा घडवणार आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
अक्षर कलावारी हा उपक्रम ट्विटर इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. यंदा येत्या गुरुवार (1 जुलै) पासून रोज एक आर्टवर्क ती दोन्ही प्लॅटफॉर्मवर पोस्ट करणार आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
मूळची पंढरपूरची असलेली शीतल आता कामानिमित्त अमेरिकेतील बोस्टन येथे असते. माझा जन्म पंढरपूरचा आणि माझं अर्ध शिक्षणही पंढरपुरताच झालं, तिथल्या मातीशी नाळ जोडलेली आहे ती या मुळेच. लहानपणापासून जेवढा विठ्ठल अनुभवला होता तर तो अक्षरचित्र रूपात कसा दिसू शकेल या मध्यवर्ती संकल्पनेतून हा उपक्रम मी राबवते आहे. रोज एक अभंग घेऊन त्यावर सुलेखन रचना आणि चित्रकलेचे प्रयोग मी विठ्ठलाला साकारण्यासाठी केले. या प्रमाणे अनेक सुलेखने आणि त्यामागील विचार आषाढी एकादशीपर्यंत ट्वीट करते. असं तिने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
(PHOTO : @sheetaltara21/Instagram)
(PHOTO : @sheetaltara21/Instagram)
(PHOTO : @sheetaltara21/Instagram)
(PHOTO : @sheetaltara21/Instagram)
(PHOTO : @sheetaltara21/Instagram)