In Pics | विठुरायाच्या अंगी आता गावोगावच्या विठ्ठल मंदिराला देणार, मंदिर समितीची अनोखी योजना
विठुरायाच्या पोशाख म्हणजे अंगावर मखमली अंगी , कमरेला शेला आणि रेशमी सोवळे अथवा धोतर .. याच पोशाखात बाराही महिने विठुराया खुलून दिसत असतो. यातील रेशमी सोवळे अथवा धोतर आणि कमरेचा शेला हा तयार मिळतो. (Photo Courtesy : FB/@VitthalRukminiTodayDarshan)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र देवाच्या अंगावर घालण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अंगी या शिवून घ्याव्या लागतात. या मखमली, रेशमी, भरजरी अशा विविध प्रकारच्या कापडाच्या या अंगी शिवून घेतल्या जातात . हे शिवणारे पंढरपूरमध्ये खास शिंपी आहेत. (Photo Courtesy : FB/@VitthalRukminiTodayDarshan)
कमरेवर हात ठेऊन उभ्या असणाऱ्या विठुरायाला ही अंगी घालताना खास पद्धतीने बाराबंदी सारखे शिवावी लागते. (Photo Courtesy : FB/@VitthalRukminiTodayDarshan)
देवाचे पोशाख भाविकांकडून मंदिराला मिळत असल्याने देवासाठी कधी पोशाख खरेदी करायची वेळ मंदिरावर येत नाही. बहुदा एकदा देवाच्या अंगावर घातलेला पोशाख दुसऱ्यांदा घालायची वेळ येत नाही. (Photo Courtesy : FB/@VitthalRukminiTodayDarshan)
यामुळे सध्या मंदिरात विठुरायाच्या हजारापेक्षा जास्त चांगल्या अंगी शिल्लक असून आता या अंगी गावोगावातील विठ्ठल मंदिरांसाठी भाविकांना मोफत देण्याची योजना मंदिर समितीने काढली आहे. (Photo Courtesy : FB/@VitthalRukminiTodayDarshan)
साक्षात विठुरायाच्या अंगावर घातलेली ही अंगी आपल्या गावातील विठ्ठल मूर्तीला परिधान करण्याचा आनंद आता गावोगावच्या विठ्ठल भक्तांना घेता येणार आहे. (Photo Courtesy : FB/@VitthalRukminiTodayDarshan)
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी या अंगी आषाढी यात्रेनंतर मंदिराशी संपर्क करून घेऊन जाव्यात असे आवाहन राज्यभरातील भाविकांना केले आहे . (Photo Courtesy : FB/@VitthalRukminiTodayDarshan)