PHOTO : अवघा रंग एक झाला... विठुमाऊलीच्या गाभाऱ्यात द्रांक्षांची आरास
आज चैत्र शुद्ध अर्थात कामदा एकादशी निमित्त आज विठुरायाच्या मंदिराला आकर्षक रीतीने द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील शेतकरी संजय टिकोरे यांनी आपल्या शेतातील द्राक्षे आणून ही सजावटीची सेवा दिली आहे.
विठ्ठल, रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी या द्राक्षांच्या साहाय्याने अतिशय कल्पकतेने ही सजावट करण्यात आली आहे.
नवीन मराठी वर्षातील वारकरी संप्रदायाचा हा पहिला सोहळा असला तरी कोरोनाच्या संकटामुळे या कामदा एकादशीला एकही भाविकाला पंढरपूरमध्ये प्रवेश नसणार आहे.
कोरोना संकटामुळे काल रात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
पंढरपूर शहर आणि परिसरातही खूप मोठ्या संख्येने कोरोनाचा फैलाव झाला असल्याने एकाही वारकऱ्याला आजच्या एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
कोरोना प्रादुर्भावामुळे विठ्ठल मंदिर गेल्या काही दिवसापासून बंद आहे.
चैत्री एकादशीच्या सर्व परंपरा, पूजा-अर्चा मंदिर समितीच्या वतीने पार पाडण्यात येत आहे.