Nashik Oxygen Tanker Leaked : भीषण... नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँकमध्ये गळती, 11 रुग्णांचा मृत्यू, पहा फोटो...
राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना, नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया गळतीमध्ये 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनीही 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं.
दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.