PHOTO : पंढरीत विठ्ठल-रुक्मिणी विवाह संपन्न; वसंत पंचमीच्या मुहूर्तावर अक्षता, पाहा लग्नाचे खास फोटो
Pandharpur Vitthal Rukmini Vivah : वसंतपंचमी मुहूर्तावर आज दुपारी बारा वाजता साक्षात परब्रह्म पांडुरंगाचा विवाहसोहळा संपन्न झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम आज सकाळपासूनच मंदिर परिसरात सुरु झाली होती.
यंदाही कोरोनाचे संकट असल्याने अगदी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा स्वर्गीय सोहळा संपन्न झाला.
लग्नवधू अर्थात जगतजननी रुक्मिणीमातेला पांढरी शुभ्र रेशमी नऊवारी नेसविण्यात आली होती तर नवरदेव विठुरायाला देखील पांढरेशुभ्र रेशमी करवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरी पगडी परिधान करून सजविण्यात आले होते.
आज वसंत पंचमी असल्याने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली होती , वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.
फुलांच्या महालाचे रूप देण्यात आलेल्या विठ्ठल सभा मंडपात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्ती आणण्यात आल्या . भागवताचार्य अनुराधा शेटे या विठ्ठल रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगताना त्यांनी रुक्मिणी स्वयंवराचा अध्याय सांगितला. यानंतर साक्षात देवाच्या लग्नाची सुरुवात झाली.