PHOTO : धरतीवर अवतरलं स्वर्ग! आज पांडुरंगाच्या डोक्यावर पडणार अक्षता, विठ्ठल-रुक्मिणीचा लग्नसोहळा
वसंत ऋतू अर्थात ऋतुराज... निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो साक्षात देवाचा विवाह. वर असतो परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी
तसे देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात
हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरु झालेली आहे.
सध्या कोरोनाचे संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे .
यावर्षी संपूर्ण विठ्ठल सभा मंडपात फुलांचा महाल बनविण्यात आला आहे.
पुणे येथील भाविक भारत भुजबळ हे दरवर्षी देवाच्या लग्नासाठी फुल सजावटीची सेवा देत असतात.
गेले पंधरा दिवसापासून 150 कारागीर या सजावटीसाठी धडपड करीत आहेत.
यावेळी लग्नस्थळ असणाऱ्या विठ्ठल सभा मंडपाला सात प्रकारच्या फुलांच्या सजावटीत महालाचे रूप देण्यात आले आहे.
यामध्ये लाल , पिवळा झेंडू , अष्टर , पांढरी शेवंती , पांढरी डिफरी अँथोरियमसह इतर पाना फुलांचा वापर केला जात आहे.
याशिवाय लग्न मंडपासमोर फुलांचे द्वारपाल तयार केले आहेत.
नामदेव पायरी समोर फुलांची विठ्ठल रुक्मिणी साकारली असून लग्न सोहळ्यातील मंगल वाद्यांची आकर्षक फुल सजावट असणार आहे.
या लग्न सोहळ्यासाठी २० प्रकारची देशी विदेशी अशी ६ टन फुले आणण्यात आली असून यात ९ रंगांच्या शेवंती , ६ प्रकारचे गुलाब यांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजावटीसाठी केला गेला आहे .