Maghi Ganesh Jayanti : माघीचा गणेश जयंतीचा उत्साह; मंदिरं सजली, भाविकांची गर्दी
Maghi Ganesh Jayanti 2022 : हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. याच दिवशी गणेशाचा जन्म झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशाच्या जन्माचे स्मरण म्हणून ही जयंती साजरी केली जाते. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात.
पाली, रायगडच्या गणपती मंदिराला माघी गणशोत्सवानिमित्त रोषनाई करण्यात आली आहे.
पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरामध्ये गणेश दर्शनासाठी माघी गणेश चतुर्थीदिवशी भाविक गर्दी करत असतात.
माघी गणेश जयंतीनिमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांकडून सिद्धीविनायक मंदिर परिसरात रांगा लागल्याचं चित्र आहे.
कोरोनाची परिस्थिती कायम असल्यानं क्युआर कोड मार्फतच भाविकांना दर्शनाची सोय सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सोय करण्यात आली आहे.
प्रति तास एक हजार भाविक दररोज बाप्पाचे दर्शन घेत असतात मात्र आज प्रति तास दीड हजार भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध असणार आहे.
सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत बाप्पाचे दर्शन भाविक घेऊ शकणार आहेत. ज्यांना क्युआर कोडमार्फत दर्शनासाठी स्लाॅट मिळाला नाही ते भाविक बाहेरुन दर्शन घेताना बघायला मिळत आहेत
तिकडे पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक ,स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.