PHOTO : उष्म्याचा त्रास जाणवू नये म्हणून विठुरायाची चंदन उटी पूजा
Vitthal Rukmini temple Pandharpur : राज्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक दिवसापासून तापमानाचा पारा चढताच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया उष्म्याचा दाह देवाला जाणवू नये म्हणून परंपरेप्रमाणं पंढरपूरच्या विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात झाली आहे.
वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाणवू लागली असताना मंदिर समितीनं परंपरेनुसार विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात केली.
मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याहस्ते सपत्नीक पहिली चंदन उटी पूजा पार पडली.
आता तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ असल्यानं विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतल अशा चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येत असतो. यासाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येत असते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत हा चंदनउटीची पूजा होत असते.
विठुरायाच्या पोषाखाच्यावेळी आता रोज ही पूजा होणार असून, देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठुरायाप्रमाणेच रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली.
शासनानं निर्बंध उठवल्यानं दोन वर्षानंतर आजपासून भाविकांना ही चंदन उटी पूजा करता येणार आहे.
देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी 750 ग्रॅम उगाळलेले चंदनाची आवश्यकता असते.
यात केशर मिसळण्यात येते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकडा आरतीच्यावेळी काढण्यात येते.