Wardha : समुद्रपूर तालुक्यात सापडले अवकाशातून पडलेले यंत्र अवशेष, पाहा फोटो
विदर्भातील काही जिल्ह्यात उल्कापात सदृष्य आगीचे लोंढे आकाशातून पडतांना गुढीपाडव्याच्या रात्री विविध गावकऱ्यांनी पाहिले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेवढे कुतूहल तेवढाच संभ्रम नागरिकांत कायम असतांना 3 मार्च रोजी समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव येथे अवकाशातून पडलेले यंत्र अवशेष आढळून आले.
सदर यंत्र पाहण्यास नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. या यंत्राचे अवशेष समुद्रपूर आणि गिरड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रात्री आकाशात दिसणारे प्रकार त्यांनतर जमिनीवर पडलेले हे अवशेष हा काय प्रकार आहे. हाच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
शेतकरी नितीन सोरते हे सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना एक सिलेंडर सारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची आढळून आली.
त्यांनी लागलीच या संबंधी समुद्रपूर पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक राम खोत यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी जाऊन हे अवशेष ताब्यात घेतले.
तर धामणगाव येथील शेतकरी भाऊराव ननावरे यांच्या गावाशेजारच्या शेतामध्ये सकाळी अवशेष आढळून आले
यावेळी गावातील नागरिकांनी हे अवशेष बघण्यासाठी एकच गर्दी केली सदर घटनेची माहिती पत्रकार गजानन गारघाटे यांना मिळताच त्यांनी गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांना कळवले.
ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन सदर अवशेष ताब्यात घेतले आहे.
मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले असून कोणत्याही नागरिकांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.