Akshar Sammelan 2022 : सोलापुरात रंगलाय अक्षरांचा उत्सव, पंढरपूरात राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचं आयोजन
पंढरपुरात राज्यस्तरीय अक्षर संमेलन भरलं होतं. यानिमित्तानं महाराष्ट्रातील जवळपास 350 पेक्षा जास्त अक्षरप्रेमी, रांगोळीकार आणि चित्रकारांनी उपस्थिती लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाझी शाळा, माझा फळा या सोशल मीडियातील ग्रुपपासून सुरु झालेल्या या चळवळीत सध्या राज्यभरातील हजारोंच्या संख्येनं अक्षर यात्री सामील झाले आहेत.
अक्षरातून माणसाच्या स्वभावाची ओळख होते, असं माननं आहे आणि या कॅलिग्राफीमुळे कलाकाराच्या भावना हटके पद्धतीनं कागदावर उतरतात. त्यामुळेच सध्या कॅलिग्राफी ही कला समाजात लोकप्रिय होताना दिसत आहे.
मंत्रालयातील महसूल आणि वन विभागाचे सहसचिव संजय इंगळे यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून कॅलिग्राफीची आवड जोपासल्याचं सांगितलं.
रायगडाच्या भावेश तोडणकर या चिमुरड्यानं एकाच वेळी दोन हात आणि तोंडात पेन धरून अफलातून कला सादर केली.
अहमदनगर येथील ज्ञानेश्वर कवडे यांनी अक्षर गणेशच्या माध्यमातून 'ABP माझा'ची कलाकृती काही सेकंदात तयार केली.
मुंबई येथील अनिल गोवळकर यानं आपली नोकरी सांभाळत कॅलिग्राफीचे विकसित केलेल्या विविध प्रकारांची प्रात्यक्षिकं सादर केली.
चूल आणि मुलं सांभाळत कन्नड तालुक्यातील मेघा बोरसे हिनं पोस्टल कलरचा वापर करत केलेलं साधूचं पोट्रेट तिच्या जिवंत कलाकृतीची साक्ष देत होतं. उच्य शिक्षण घेतलेली ही मेघा नावाची गृहिणी चित्रकलेचं कोणतंही शिक्षण न घेता केवळ आवडीच्या ओढीनं आपली कला जोपासत आहे. आज मेघा पेन्सिल, पेन, चारकोलसह इतर पद्धतीच्या कलाकुसरीत तरबेज झाली आहे.
बुलढाण्याचे गोपाळ वाकोडे यांच्या स्वाक्षरी पद्धत पाहण्यासाठी तर प्रेक्षकांची झुंबड उडत होती.
रांगोळीतील अक्षरलेखन ही सध्या लोकप्रिय होत असलेल्या कलेचं गणेश माने यांच्यासह अनेक कलाकारांनी अप्रतिम सादरीकरण केलं.
संमेलनाचे मुख्य आयोजक अमित भोरकडे यांनी या अक्षर संमेलनात सामील झालेले सर्व अक्षर यात्रींना अक्षराच्या गोडीनं एकत्रित आणल्याचं सांगितले.
मराठी मातीची ओढ या सर्व मायमराठीच्या सेवेकऱ्यांनी आपल्या कलेतून दाखवून तर दिलीच याशिवाय अनेकांना यातून कॅलिग्राफीची प्रेरणाही दिली, हेच या अक्षर संमेलनाचं यश आहे.