Jejuri : सोन्याची जेजुरी...! सोमवती अमावस्येनिमित्त उद्या यात्रा, खंडेरायाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा ही सोमवती अमावस्येला भरते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या सोमवती अमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आजपासूनच जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
उद्या सकाळी 11 वाजता पालखीतून देव हे कऱ्हा स्नानासाठी नेले जातील.
उद्या दुपारी साडे तीन वाजता देवाला कऱ्हा स्नान घातले जाईल.
सोमवती अमावस्येला खंडेरायाची मोठी यात्रा असते.
गेली 2 वर्ष ही यात्रा कोरोनामुळे भरली नव्हती
परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोठ्या उत्साहात यंदाची सोमवती यात्रा भरणार आहे.
यात्रेला 4 ते 5 लाख भाविक हे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे.
तसेच या यात्रेसाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
आजपासून भाविकांनी जेजुरीत गर्दी केली आहे.