PHOTO: आज पुत्रदा एकादशी... विठुराया-रुक्मिणी मातेच्या मंदिरास आकर्षक फुलांची आरास

आज श्रावण शुद्ध अर्थात पुत्रदा एकादशी निमित्त पुणे येथील भक्ताने विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.

यासाठी शेवंती , झेंडू , अष्टर , अँथोरियम , कार्नेशन , गुलाब , जिप्सोफेलिया , मोगरा आणि तुळस यांचा वापर करीत पाना फुलांची आकर्षक रंगसंगती साधली आहे.
श्रावण महिन्यातील एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते.
सध्या कोरोनाच्या संकटामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिरातील परंपरा मात्र अखंडित सुरु आहेत.
आज सोळखांबी , चौखांबी , विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात ही फुलांची सजावट केली आहे.
कोरोनामुळं सध्या मंदिरं बंद असल्यानं भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही.
पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरही बंद आहे मात्र सर्व नित्योपचार रोज पार पाडले जात आहेत.